जेट एअरवेजची 600 रुपयांत विमान प्रवासाची ऑफर

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वस्त तिकीटांचा सध्या पाऊसच पडतोय. प्रत्येक एअरलाइन्स स्वस्त तिकीटांची विक्री करतेय आणि त्यामुळं प्रवाशांना चांगलाच फायदा होतोय. 

Updated: Sep 8, 2014, 03:16 PM IST
जेट एअरवेजची 600 रुपयांत विमान प्रवासाची ऑफर title=

मुंबई: विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वस्त तिकीटांचा सध्या पाऊसच पडतोय. प्रत्येक एअरलाइन्स स्वस्त तिकीटांची विक्री करतेय आणि त्यामुळं प्रवाशांना चांगलाच फायदा होतोय. 

आता जेट एअरवेजनं स्वस्त तिकीटांची ऑफर आणलीय. 10 सप्टेंबरपर्यंत एअरलाइन्स स्वस्त तिकीट विकेल. या अंतर्गत 7 ऑक्टोबर ते 15 जानेवारी 2015 पर्यंत प्रवास करू इच्छीणाऱ्या प्रवाशांना 1,999 रुपयांमध्ये तिकीट मिळेल. याशिवाय 500 रुपयांच्या तिकीटांची घोषणा सुद्धा करण्यात आलीय. ज्यात प्रवाशांसाठी 16 जानेवारी 2015 ते 31 जुलै 2015पर्यंत प्रवास करणाऱ्यांना सूट मिळेल. हे तिकीट दर फक्त घरगुती प्रवासासाठी लागू आहेत.  

एअरलाइन्सनं सांगितलं की, स्वस्त तिकीट दर फक्त घरगुती प्रवासासाठी आहे आणि ते सुद्धा एकाच शहरासाठी. हे पहिले या पहिले मिळवा, या तत्वावर विकल्या जात आहेत.  
जेट एअरवेजनं यापूर्वी इकॉनॉमी क्लासची तिकीटं 500 रुपयांमध्ये विकण्याची घोषणा केली होती. 5 सप्टेंबरला ती ऑफर संपली.  

यापूर्वी स्पाइस जेटनं 499 रुपयांमध्ये तिकीट विक्रीची घोषणा केली होती. इंडिगोनंही अशाच प्रकारची ऑफर दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.