पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले. 

Updated: Jan 25, 2015, 11:37 PM IST
पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री! title=

नवी दिल्ली: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले. 

हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर सुपरपॉवर अमेरिका आणि उदयोन्मुख महासत्ता असलेल्या भारताच्या दोघा दिग्गज प्रमुखांनी 'चाय पे चर्चा' केली. नरेंद्र मोदींनी स्वतः ओबामांनी आपल्या हातांनी चहा बनवून दिला. तर संयुक्त पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच ओबामांनी तमाम भारतीयांना 'प्यारभरा नमस्कार' केला. एवढंच नव्हे तर मला भारतात आल्यानंतर बॉलिवूडच्या स्टार असल्यासारखं वाटतंय, अशी नर्मविनोदी कोपरखळी ओबामांनी लगावली. 

बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या अनोख्या मैत्रीचे विविध कंगोरे यानिमित्तानं तमाम जगाला पाहायला मिळाले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठींबा देणार असल्याचं बराक ओबामांनी स्पष्ट केलं. जगात विविध ठिकाणी भारतानं केलेल्या शांती प्रक्रियेचा गौरवानं उल्लेख ओबामा यांनी केला. 

जल-वायू परिवर्तन आणि ग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कणखरपणे भारताची भूमिका मांडली. यासंदर्भात भारतावर कुणाचाही दबाव नसल्याचं मोदींनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.