पंतप्रधान मोदी यांच्यासमोर भावूक झाले भारताचे मुख्य न्यायमूर्ती

चीफ जस्‍ट‍िस ऑफ इंडिया टीएस ठाकूर एका कार्यक्रमात भाषण करत असतांना अचानक भावुक झाले. मुख्यमंत्री आणि हाईकोर्टाचे चीफ जस्‍ट‍िस यांच्यात एका बैठकीदरम्यान टीएस ठाकूर यांच्या डोळ्यातून अश्रृ आले.  न्‍यायालयात न्यायाधिशांची संख्‍या वाढवण्याच्या मुद्यावर ते अधिक भर देऊन बोलत होते.

Updated: Apr 24, 2016, 02:27 PM IST
पंतप्रधान मोदी यांच्यासमोर भावूक झाले भारताचे मुख्य न्यायमूर्ती title=

नवी दिल्ली : चीफ जस्‍ट‍िस ऑफ इंडिया टीएस ठाकूर एका कार्यक्रमात भाषण करत असतांना अचानक भावुक झाले. मुख्यमंत्री आणि हाईकोर्टाचे चीफ जस्‍ट‍िस यांच्यात एका बैठकीदरम्यान टीएस ठाकूर यांच्या डोळ्यातून अश्रृ आले.  न्‍यायालयात न्यायाधिशांची संख्‍या वाढवण्याच्या मुद्यावर ते अधिक भर देऊन बोलत होते.

कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तेथे उपस्थित होते. न्यायालयात केसेस वाढल्या आहे त्यामुळे त्यानुसार न्यायाधीशांची देखील संख्या वाढवण्य़ात यावी अशी त्यांची मागणी होती. अनेकदा मागणी करुनही अनेक सरकारांनी यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. असं देखील त्यांनी म्हटलं.

चीफ जस्‍ट‍िस ठाकूर यांनी म्हटलं की, 'प्रलंबित खटल्यांच्या बाबतीत न्यायालयाला दोषी नाही ठरवू शकत. अनेक दबावांमध्ये प्रकरणाची सुनावणी करावी लागते. परदेशात भारतीय न्यायाधीशांच्या बाबतीत म्हटलं जातं की, भारतीय न्यायाधीश कसे ऐवढे प्रकरणं निकाली काढतात. एक अमेरिकन न्यायाधीश जेथे ८१ प्रकरणं निकाली काढतात तेथे एक भारतीय न्यायाधीश हे २६०० प्रकरणं निकाली काढतात.'