आसारामचे भक्त पोलिसांना नडले

आसाराम बापू्च्या भक्तांनी नवी दिल्लीतल्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर हिंसक आंदोलन केलं.

Updated: May 16, 2016, 09:51 PM IST
आसारामचे भक्त पोलिसांना नडले title=

नवी दिल्ली: आसाराम बापू्च्या भक्तांनी नवी दिल्लीतल्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर हिंसक आंदोलन केलं. आसाराम बापूला जेलमधून सोडून द्यावं या मागणीसाठी हे भक्त पोलीस स्टेशनबाहेर जमले होते. यावेळी त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एकूण 20 जण जखमी झाले आहेत, यामध्ये सात पोलिसांचाही समावेश आहे. 

आसाराम बापू सध्या जोधपूरमधल्या जेलमध्ये आहे. आसारामसारखीच आम्हालाही अटक करा, अशी मागणी करण्यासाठी हे आंदोलनकर्ते पोलीस स्टेशनबाहेर जमले. या जमावाला हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, तेव्हा जमावानं पोलिसांच्या गाड्या फोडल्या तसंच बॅरिकेट्सचंही नुकसान केलं. 

यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये आसारामचे भक्त आणि पोलीस जखमी झाले.