भाजपच्या कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली आहे.

Updated: Jan 3, 2017, 11:10 PM IST
भाजपच्या कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्ला  title=

कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. कोलकत्यातील भाजपच्या कार्यालयावर तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने आज हल्ला चढवला.

चिट फंड घोटाळ्यात एका आठवड्यात अटक झालेले सुदीप बंडोपाध्याय हे तृणमुलचे दुसरे खासदार आहेत. तपस पाल यांनाही CBIनं शुक्रवारी अटक केली होती. अभिनेता ते नेते असा प्रवास केलेले बंडोपाध्याय यांना भुवनेश्वरमधून CBIनं ताब्यात घेतलं.

या अटकेमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तिळपापड झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सुडाचं राजकारण करत असल्याची ओरड त्यांनी केलीये. काँग्रेसनंही या प्रकरणी भाजपाला टार्गेट केलं असताना भाजपानं मात्र हे आरोप फेटाळलेत.