भोपाळ : सेंट्रल जेलमधून फरार होत असताना सिमीच्या ८ दहशतवाद्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्स्टेबल रमाशंकर यादव यांच्यावर हल्ला केला ज्यामध्ये ते शहीद झाले. मंगळवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळेस म्हटलं की, देश शहीद यादव यांचं बलिदान लक्षात ठेवेल.
रमाशंकर यादव यांची मुलीच लग्न होणार होतं. घरात लग्नाची तयारी सुरु होती. पण अशावेळेतच देशसेवेत ते शहीद झाले. लग्नाच्या पत्रिका वाटप झाल्या होत्या. शहीद रमाशंकर यांनी एक महिन्याच्या सुट्टीसाठी अर्ज देखील केला होता. ९ डिसेंबरला त्यांच्या मुलीचं लग्न होणार होतं.
कॉन्स्टेबल रमाशंकर यादव हे उत्तर प्रदेशातील बलियामधील राजपूरचे राहणारे होते. त्यांना दोन मुलं आहेत आणि दोन्ही ही सैन्यात आहेत.
शहीद रमाशंकर यांच्या पार्थिवाला मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी खांदा दिला.