मुख्यमंत्री भडकले, भर समारंभात केलं अधिकाऱ्याला सस्पेंड

झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास एका कार्यक्रमात बोलत होते. त्यादरम्यान त्यांना राग आला आणि ते अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. एका अधिकाऱ्याला ओरडत त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे आदेश देऊन टाकले.

Updated: Dec 7, 2015, 09:17 PM IST
मुख्यमंत्री भडकले, भर समारंभात केलं अधिकाऱ्याला सस्पेंड title=

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास एका कार्यक्रमात बोलत होते. त्यादरम्यान त्यांना राग आला आणि ते अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. एका अधिकाऱ्याला ओरडत त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे आदेश देऊन टाकले.

रविवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री  रघुबर दास एका सरकारी कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रमात एक अधिकारी फोनवर बोलत असल्याने त्यांनी त्याला हॉलमधून बाहेर काढलं. पण अर्ध्या तासानंतर त्या अधिकाऱ्याला पुन्हा आत बोलावून घेतलं.

काही वेळानंतर मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू झालं. त्यावेळेस धनबादचे एसडीएम मंचावर आले. त्यावर रघुवर दास यांना एवढा राग आला की त्यांनी त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे आदेश देऊन टाकले.

रघुवर दास यांच्या या आदेशानंतर तेथे उपस्थित सगळेच अधिकारी सतर्क झाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.