शाहरूखने चेन्नईच्या नागरिकांसाठी दिले एक कोटी रूपये

 शाहरूख खानने चेन्नईच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रूपयांचे दान करण्याची घोषणा केली आहे. शाहरूख खानची इव्हेंट कंपनी रेड चिली आणि टीम 'दिलवाले' यांच्याकडून मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये एक कोटी  रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

Updated: Dec 7, 2015, 08:58 PM IST
शाहरूखने चेन्नईच्या नागरिकांसाठी दिले एक कोटी रूपये  title=

नवी दिल्ली :  शाहरूख खानने चेन्नईच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रूपयांचे दान करण्याची घोषणा केली आहे. शाहरूख खानची इव्हेंट कंपनी रेड चिली आणि टीम 'दिलवाले' यांच्याकडून मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये एक कोटी  रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

या संदर्भात शाहरूखने रेड चिलीमार्फत एक पत्र तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना एक पत्र पाठवून ही मदत दिली आहे. 

चेन्नईच्या पुराने रेड चिली आणि दिलवालेची टीम खूप दुःखी आहे. या दुःखदायक स्थितीमध्ये लोकांनी एकमेकांची मदत करायला हवी म्हणून आम्ही मुख्यमंत्री निधीत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ही खूप लहान मदत आहे, असेही शाहरूखने म्हटले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.