नवी दिल्ली: सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीस ओडिशातील तालबिरा-२ हा कोळसा खाणपट्टा देण्यास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रस्थापित पद्धतीचा भंग करून संमती दिली. त्यामुळं खासगी कंपनीस मोठ्या नफ्याचं घबाड मिळालं आणि सरकारी न्येवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनचं नुकसान झाल्याचं सकृद्दर्शनी दिसतं, असं मत नोंदवत 'सीबीआय' विशेष कोर्टानं डॉ. सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी करत ८ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं होतं.
डॉ. सिंग यांच्याखेरीज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी. पारख, हिंदाल्को कंपनी आणि हिंदाल्कोचे वरिष्ठ अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी. भट्टाचार्य यांनाही समन्स जारी करण्यात आलं होतं. मात्र आज सुप्रीम कोर्टानं डॉ. सिंग आणि इतरांवरील समन्सला स्थगिती दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.