कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे

कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे घेतलाय. कामगारांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांच्यात सुमारे साडे सहा तास चर्चा झाली. 

PTI | Updated: Jan 8, 2015, 09:18 AM IST
कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे title=

नवी दिल्ली: कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे घेतलाय. कामगारांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांच्यात सुमारे साडे सहा तास चर्चा झाली. 

या चर्चेत दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला त्यानंतर 'आटक'चे नेते लखनलाल महातो आणि पियूष गोयल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. कामगारांचा संप मागे घेण्यात आल्याने देशावरील संभाव्य उर्जा संटक टळलंय. 

संपामुळे गेल्या दोन दिवासांपासून देशातील बहुसंख्य खाणींचं काम ठप्प झालं होतं. त्याचा मोठा फटका ४२ ऊर्जा प्रकल्पांना बसला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.