नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. या समितीमध्ये पाच जणांचा समावेश आहे.
याप्रकरणी शशी थरुर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान या प्रकरणी नवा खुलासा झालाय.सुनंदा यांचा मृत्यू पोलोनियम २१० या विषामुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय़.
याप्रकरणी सुनंदा यांच्या व्हिसेरा रिपोर्टसाठी अमेरिकन तपासयंत्रणा एफबीआयची मदत घेतली जाणार आहे.. भारतात पोलोनियम २१० विषाबाबत तपास करणं शक्य नाही. त्यामुळं हा तपास परदेशात शक्य आहे.. हे विष दुबई किंवा पाकिस्तानातून आणल्याचा पोलिसांना संशय आहे.. त्यामुळं १७ जानेवारी २०१४ रोजी भारतात आलेल्या नागरिकांची यादी पोलीस तपासत आहेत. तिकडे पोलोनियम विष रशियातून आणलं गेल्याचा दावा भाजप नेता सुब्रम्हण्यम स्वामी य़ांनी केलाय.
दरम्यान सुनंदा पुष्कर यांचं पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांच्या टीममधील सुधीर गुप्ता यांनी काही बोलण्यास नकार दिलाय.
आतापर्यंत कोणाचा मृत्यू
पोलोनियम २१० विषामुळे २००४ मध्ये पॅलेस्टाईन नेते यासर अराफत यांचा मृत्यू पोलोनियम २१० या विषामुळे झालं होता.. त्यानंतर २००६ साली केजीबी डिटेक्टिव्ह अलेक्झांडर लित्विनेको याचाही मृत्यू याच विषामुळे झाला होता. आणि एक वर्षाआधी माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यूसुद्धा पोलोनियम २१०या विषामुळे झाल्याचं समोर येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.