चेन्नई : भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे, हे विमान चेन्नईजवळील किनाऱ्यावर बेपत्ता झाले. विमानात तीन पायलट आहेत, शोध घेण्यात येत आहे.
तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावरून सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता विमानाने उड्डाण घेतले होते.
तिरुचिरापल्ली येथे रात्री दहाच्या सुमारास विमान असताना पायलटशी शेवटचा संपर्क झाला होता.
तेव्हापासून विमान रडारवरून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. विमानाच्या शोधासाठी आणखी एक विमान पाठविण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.