देशभरात थंडीची लाट

उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 तर लेह येथील तापमान उणे 11.9 अंशावर गेलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

Updated: Dec 11, 2016, 04:46 PM IST
देशभरात थंडीची लाट title=

मुंबई : उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 तर लेह येथील तापमान उणे 11.9 अंशावर गेलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

अनेक ठिकाणी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. चंदीगढमध्ये तापमान 11.2 अंश, अंबालामध्ये 10.4 अंश, कर्नालमध्ये 10.2, हिसारमध्ये 11.03 अंसं तापमान नोंदवण्यात आलं आहे. काश्मीर खो-यात या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. घटत्या तापमानामुळे श्रीनगरचं प्रसिद्ध दल सरोवर गोठण्यास सुरुवात झाली आहे. तर सिमला, कुलु मनालीतही थंडीचा कडाका वाढला आहे.