नवी दिल्ली : टेलिव्हिजनवरचा सर्वात चर्चेचा आणि सध्या वादग्रस्त ठरलेला 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचा आणखी एक वाद आता समोर आलाय. यावेळी, हा वाद सुरू झालाय तो या कार्यक्रमात दिसणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या एका जोकवरून...
८ एप्रिल रोजी टेलिकास्ट झालेल्या भागात पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या सिद्धू यांनी एक अश्लील आणि डबल मिनिंग जोक केला होता.
एक मंत्री असूनही या कार्यक्रमाचा भाग बनून राहिलेल्या सिद्धू यांच्यावर हा आरोप पंजाब अॅन्ड हरियाणा हायकोर्टाचे सीनिअर वकील एचसी अरोडा यांनी केलाय.
अरोडा यांनी या प्रकरणी पंजाबच्या मुख्य सचिवांना तक्रार चिठ्ठी लिहून हे प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केलीय. पंजाब सरकारच्या मंत्रीपदाची प्रतिष्ठा आणि संहितेला सिद्धू यांनी धक्का लावल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. शिवाय सिद्धू यांनी आयटी अॅक्टचं उल्लंघन केल्याचाही आरोप अरोडा यांनी केलाय.
आपल्या जोकमध्ये अश्लिलला असतील तर सध्या आपण लोकप्रियतेत टॉपवर नसतो... फळांनी लगडलेलं झाडचं नेहमी निशाण्यावर येतं, असं म्हणतं सिद्धू यांनी अरोडा यांचे हे आरोप फेटाळून लावलेत.