गुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल

भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 21, 2013, 08:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
आरक्षित तिकिट असणारा प्रवासी काही कारणास्तव प्रवास करत नसेल तर त्याच्या जागी कुटुंबातील अन्य व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे तुमच्या तिकिटावर दुसरा प्रवास करू शकतो. मात्र, यासाठी एक काळजी घ्यावी लागेल. ती म्हणजे असा प्रवास करण्यासाठी दिलेल्या मुदतीत रितसर अर्ज करून नवे तिकीट घ्यावे लागणार आहे. ही सवलत लग्न मंडळी म्हणजे वऱ्हाडी, विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना असणार आहे.
या सुविधेसाठी गाडी सुटण्याच्या अगोदर २४ तास आधी चीफ रिझर्वेशन सुपरवायजरकडे (सीआरएस) अर्ज करून तसं कळवावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्या तिकीटावर तुमचे आई-वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी तसेच पत्नी प्रवास करू शकणार आहेत. प्रवास करणाऱ्या संबंधित व्यक्तीचे नाव कुटुंबा रेशनकार्डमध्ये असणे गरजेचे आहे.
कुटुंब सदस्यांबरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही सवलत आहे. एखादा सरकारी कर्मचारी तिकिट आरक्षित असतानाही प्रवास करू शकत नसेल तर त्याच्याबदली त्याच तिकीटावर दुसरा कर्मचारी प्रवास करू शकणार आहे. केवळ १० टक्के प्रवाशांनाच ही सवलत असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.