काँग्रेसकडून मोदींच्या जीवाला धोका?

किश्वर यांनी मोदींवर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता ट्विटरवर व्यक्त केली. यानंतर त्यावर उसळलेल्या वादामुळे त्यांनी ही ट्विट डिलीटही केली. पण त्यापूर्वी हजारो लोकांनी हे ट्विट वाचलं आणि त्यात कितपत तथ्य आहे, यावर वाद सुरू केला

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 18, 2013, 05:30 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात असणारी व्यवस्था पुरेशी नसल्याचंही काही जणांचं म्हणणं आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या जीवाला धोका असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यताही व्यक्त केली गेली आहे. प्रसिद्ध लेखिका मधू किश्वर यांचं असं म्हणणं आहे.
किश्वर यांनी मोदींवर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता ट्विटरवर व्यक्त केली. यानंतर त्यावर उसळलेल्या वादामुळे त्यांनी ही ट्विट डिलीटही केली. पण त्यापूर्वी हजारो लोकांनी हे ट्विट वाचलं आणि त्यात कितपत तथ्य आहे, यावर वाद सुरू केला.

मधू किश्वर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं होतं, “काल काही वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून मला माहिती मिळाली. जर तिस्ता, काँग्रेस मोदींविरोधात गोध्रा हत्याकांडासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात अयशस्वी ठरली, तर ते मोदींची हत्या करण्याची पूर्ण शक्यता आहे” या ट्विटमध्ये किश्वर यांनी तिस्ता सेटलवाड या सामाजिक कार्यकर्त्यांचेही नाव लिहिले होते. तिस्ता सेटलवाड यांनीच मोदींविरोधात पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यामुळे या ट्विटमुळे नवे प्रश्न मोदी समर्थकांपुढे उभे राहिले आहेत.