नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटोपासून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
हा फोटो एका हॉटेलमधील आहे. रेणुका चौधरी आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण घेत आहेत. एक महिला रेणुका यांच्या शेजारी उभी आहे. ती मेड असल्याचे सांगितले जात आहे. ही महिला लहान बाळाची देखभाल करण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर 'मॉडर्न स्लेवरी' असे नाव दिले गेलेय. या फोटोत सरळ सरळ दिसत आहे. चौधरींचे कुटुंबीय खुर्चीवर बसलेले आहेत. ते ऑर्डर करत आहेत आणि एक महिला रेणुका चौधरी यांच्या खुर्चीच्या मध्ये उभी आहे.
रेणुका यांच्या हा फोटो सर्व प्रथम ट्विटरवर ऋषि बागरी या नावाच्या व्यक्तीने ट्विट केलाय. त्यानंतर २००० पेक्षा जास्त वेळा हा फोटो रिट्विट झालाय. लोक काँग्रेसवर टीका करीत आहेत.
Dear Renuka Chowdary
If you can't feed the little girl minding your child,
please don't bring them to a restaurant! pic.twitter.com/N104ZYtVKN— Rishi Bagree (@rishibagree) May 31, 2016