भारतरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा वादंग

Updated: Aug 11, 2014, 10:07 PM IST
भारतरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा वादंग title=

केंद्रानं पाच भारतरत्न पदक बनवण्याचे टाकसळीला आदेश दिल्यानंतर ते पाच जण कोण असणार या पासून ते कोण कोण असावं इथपर्यंत चर्चेला सुरूवात झाली आणि वाद ही निर्माण झाला.

केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या टांकसाळीला 5 भारतरत्न पदकं तयार करण्याची ऑर्डर दिल्याची माहीती आली आणि देशात पुन्हा एकदा भारतरत्नांच्या नावांची चर्चा सुरू झाली. प्रत्येक पक्षानं आणि संघटनांनी भारतरत्नासाठी नावं द्यायला सुरूवात केलीये.

सरकारनं यावर कुठलीच अधिकृत घोषना केली नसली तरी सध्या 2 नावं चर्चेत आहेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. तर काँग्रेसचे मनिष तिवारी यांनीही एक भलीमोठी यादीच सादर केलीये.

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचंही नाव चर्चेत असताना अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचं नावही काँग्रेसच्या रशिद अल्वी यांनी पुढे केलंय. तर शिवसेनेनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव सुचवलं आहे.

बसपाचे संस्थापक कांशीराम यांचं नाव पक्षाच्या नेत्या मायावती यांनी ही आपली जुनीच मागणी असल्याचं म्हणून पुढे केलंय.

दरम्यान, नेताजींसारखे राष्ट्रपुरुष हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा कितीतरी मोठे आहेत. त्यांना पुरस्कार देण्यापेक्षा त्यांच्या बेपत्ता होण्याचा शोध घ्या अशी मागणी नेताजींचे पणतू सुगोतो बोस यांनी केलीय.

गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरचं नाव भारतरत्न पुरस्कारासाठी पुढे आलं आणि असाच वाद झाला. यावेळी तर कोणाचं नावही जाहीर झालेलं नाही तरी त्याआधीच वादाला सुरूवात झाली आहे. भारतरत्न हे देशातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्याचा असा खेळखंडोबा होणं योग्य नाही, हे जाणून सरकरानं वेळीच याला पायबंद घालण्याची गरज आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.