नवी दिल्ली : आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा वादात अडकलेत. सध्या वाद सुरू आहे तो केजरीवाल सरकारनं राष्ट्रीय चॅनलवर प्रदर्शित केलेल्या एका जाहीरातीवरून...
'आप'नं बुधवारपासून या जाहिरातीचं प्रसारण सुरू केलंय. ९० सेकंदांच्या या जाहिरातीत कमीत कमी आठ वेळा केजरीवाल यांचं नाव आलंय.
आपच्या या जाहिरातीवर विरोधी पक्षानं जोरदार टीका केलीय. आपलं विकासाचं ध्येय विसरून आपचे नेते आपल्या जाहिरातीवर सरकारी पैसा खर्च करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही जाहिरात म्हणजे खोटेपणाचा कळस आहे. केजरीवाल सरकारकडे सफाई कामगारांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत पण जाहिरातींसाठी आहे, अशीही टीका विरोधकांनी केलीय.
तर, दिल्ली सरकारच्या या जाहिरातीत काहीही चुकीचं नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन ही जाहिरात बनवताना करण्यात आलंय, असं स्पष्टीकरण आप नेते आशुतोष यांनी दिलंय.
पाहा, केजरीवाल यांची वादग्रस्त जाहिरात...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.