www.24taas.com, मुंबई
रतन टाटा ग्रुपचे चेअरमन असले तरी संपूर्ण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रत्येक जणच त्यांच्या कार्यशैलीचा चाहता आहे. रतन टाटा यांनी ज्या पद्धतीनं विखुरलेल्या कंपन्यांना एकत्र जोडत टाटा हा ग्लोबल ब्रॅंड बनवला, त्या सा-यालाच नेतृत्वाचं एक सर्वात मोठं उदाहरणं मानलं जातंय..
कॉर्पोरेट विश्वात रतन टाटा यांची ओळख टाटा अशीच आहे. ते आता भलेही कॉर्पोरेट जगतात सक्रिय राहणार नसले तरी त्यांच्या नेतृत्व गुणांची आणि दूरदर्शीपणाची अनेक उदाहरणं ही कपंन्याच्या बोर्ड रुममध्ये पुढली अनेक वर्षं सांगितली जातील. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली समूहानं प्रचंड विस्तार आणि यश गाठलंय. मग ते नव्या कंपन्यांची खरेदी असो किवा कंपन्याचा विस्तार असो.. प्रत्येक पावलावर यशाची नवी शिखर त्यांनी संपादन केली..
रतन टाटा यांची वचनबद्धता आणि धोका पत्करण्याची क्षमता अर्थविश्वात नेहमीच गौरवली गेलीय. कर्मचारी आणि शेअरहोल्डर्समध्ये एक विश्वसनीय सीईओ अशीच त्यांची प्रतिमा राहिली आहे. `मिस्टर डिपेंडबल` ही त्यांची कॉर्पोरेट क्षेत्रातली ओळख आहे, ती त्यामुळेच... कॉर्पोरेट क्षेत्राबाहेरही रतन टाटा यांनी दिलेलं योगदान हे ठळक उदाहरण म्हणता येईल. पदभार सोडल्यानंतर रतन टाटा सामाजिक क्षेत्रातलं आपलं योगदान वाढवतील आणि अर्थव्यवस्थेत कुशल सल्लागार म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील, अशी आशा व्यक्त केली जातेय..
रतन टाटा यांनी १४ हजार कोटींवरुन ४ लाख ७५ हजार करोडवर नफा नेला. त्याचप्रमाणे ८४ वरुन १०० कंपन्या. २६ लाखांवरुन भागधारकांची संख्या ३८ लाखांवर नेली. ४.७ बिलीयन डॉलरवरुन ५८.५ बिलीयन डॉलरवर आंतरराष्ट्रीय व्यापार. कुठल्याही आंतरराष्ट्रीय समुहाच्या प्रमुखाला हेवा वाटेल असे हे आकडे आहेत.
देशात उदारीकरणाचे, जागतिकीकरणाचे वारे वाहयाला सुरुवात झाली आणि रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमुहाची सूत्रे हाती घेतली. व्यवसायाच्य पद्धती, त्यातील स्पर्धा, एकूणच वातावरण बदलत होतं. अशावेळी इतक्या बलाढ्य समुहाला झपाट्यानं बदलवणं हे एक मोठं आव्हान होतं. आज टाटा उद्योग समुहाची ५० टक्के उलाढाल परदेशात आहे, ह्यातच त्यांनी किती झपाट्यानी बदल घडवला हे जाणवतं..
टाटा उद्योगसमुहानं जी विविध देशात विस्तार करताना त्यांचा झपाटा अफलातून होता. त्यातल्या व्यवसायाचं वैविध्य वाखाणण्याजोगं होतं. २००७ साली कोरस ही पोलाद क्षेत्रातील कंपनी, २००८ साली lUXURY CAR मधली जॅग्वार, त्याआधी हॉटेल क्षेत्रातील RITZ CARITION तर चहा उत्पादनातील टेटली यातल वैविध्य स्तिमीत करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी काही उद्योगातून टाटा उद्योग समूहाचे अंगही काढून घेतलं. त्यामध्ये साबण, वस्त्रोद्योग, प्रिटींग, पेंटस, I7, हार्डवेअर याचा उल्लेख करता येईल. तर काही नवीन उद्योगातही धडाक्यात मुसंडी मारली. त्यामध्ये टेलिकॉ़म, मोटार, रिटेल, इन्शुरन्स, बजेट हॉटेल, लो कॉस्ट हाऊसिंग यांचा उल्लेख करता येईल...