ऑनलाईन गंड्यानं संपूर्ण कुटुंबालाच संपवलं!

भामट्यांनी घातलेल्या ऑनलाईन गंड्यानं एका संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करून टाकलंय. झालेल्या नुकसानीनं खचलेल्या एका कुटुंबानं आत्महत्या केलीय.   

Updated: Dec 27, 2014, 02:01 PM IST
ऑनलाईन गंड्यानं संपूर्ण कुटुंबालाच संपवलं! title=

रायपूर : भामट्यांनी घातलेल्या ऑनलाईन गंड्यानं एका संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करून टाकलंय. झालेल्या नुकसानीनं खचलेल्या एका कुटुंबानं आत्महत्या केलीय.   

सुपेला इथले रहिवासी वेअर हाऊस मॅनेजर मनीष जयस्वाल, त्यांची पत्नी संध्या जयस्वाल यांनी गळफास लावून आत्महत्या केलीय. याआधी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना किडे-मुंग्या मारण्याचं औषध देऊन त्यांचंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये, सहा महिन्यांचा श्रेयांश याचा मृत्यू झालाय. पण सहा वर्षांचा अक्षय मात्र यातून वाचलाय... परंतु, त्याची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

मनीष जयस्वाल यांना दिल्लीच्या एका सिटीझन फायनान्स कंपनीनं आपल्या जाळ्यात ओढून १२ लाख रुपये उकळले होते... सध्या, ही कंपनी कुठेय? त्याचा काहीही आत्तापत्ता नाही. आपल्या आयुष्यभराची कमाई अशी डोळ्यांदेखत आपल्या हातांनी गमावल्याचं लक्षात आल्यानंतर मनीषनं एका चिठ्ठीत सगळं काही कथन करून आपलं जीवन संपवलं.

सुसाईड नोटमध्ये मनिषनं कंपनीनं केलेल्या विश्वासघातामुळे हे पाऊल उचलल्याचं म्हटलंय. कंपनीच्या अशोक कुमार आणि हरविंदर सिंह नावाच्या दोन एजंटांच्या तो सतत संपर्कात होता. १७ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०१४ या दरम्यान मनिषनं अनेकदा त्यांना फोन केले होते.  

गुरुवारी सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास मनीषच्या भावानं अक्षयचा रडण्याचा आवाज ऐकला... घरात येऊन पाहिलं असता मनीष आणि त्याची पत्नी फाशी घेतल्याचं त्यानं पाहिलं. त्यानंतर त्यानं पोलीसांना याबद्दल सूचना दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.