बायकोला मारहाण अगदी बरोबर! कोर्टाचा निकाल

महिलांनो तुमचा नवरा जर तुम्हांला मारहाण करतोय, तर मार खा!!! असा असा निकाल आता कोर्टाने दिला आहे.

Updated: Sep 7, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
महिलांनो तुमचा नवरा जर तुम्हांला मारहाण करतोय, तर मार खा!!! असा असा निकाल आता कोर्टाने दिला आहे. नवरा जोपर्यंत बायकोची योग्य काळजी घेत आहे, तोपर्यंत नवर्‍याने तिला मारझोड केली तरी ते योग्यच आहे, असा अजब निकाल कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती के. भक्तवत्सल यांनी एका खटल्यात दिला आहे.
त्यांच्या या निकालामुळे महिलावर्गात संतापाची लाट उसळली असून भक्तवत्सल यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. नवरा वारंवार मारहाण करत असल्याने एका विवाहितेने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्या खटल्याची सुनावणी भक्तवत्सल यांच्यापुढे सुरू होती.
संबंधित विवाहितेने आपला संसार आणि मुलांसाठी पतीकडून होत असलेली मारहाण सहन केली पाहिजे असा अजब फैसला त्यांनी सुनावला.भक्तवत्सल यांच्या या अजब फतव्यामुळे संतापलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पदावरून हटवण्यासाठी ऑनलाइन मोहीमच उघडली आहे.