मोदींच्या मंत्र्याविरोधात रेप केसमध्ये नोटीस

मोदी सरकारमधील रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री आणि चार वेळा भाजपचे खासदार असलेले निहालचंद मेघवाल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणात नोटीस बजावली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 12, 2014, 07:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मोदी सरकारमधील रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री आणि चार वेळा भाजपचे खासदार असलेले निहालचंद मेघवाल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणात नोटीस बजावली आहे.
बलात्कारच्या या प्रकरणात केंद्रीय मंत्री आणि राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील भाजपचे खासदार निहालचंद मेघवालसह १८ आरोपी आहेत. कोर्टाने निहालचंद यांना या प्रकरणात आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
या प्रकरण एकदा बंद करण्यात आले होते. पण सेशन कोर्टाने या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आहे. निहालचंद यांच्यावर २०११मध्ये बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. एका महिलेने वैशाली नगर येथील पोलीस स्टेशनमध्ये निहालचंदसह १८ जणांवर प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी चौकशीनंतर २०१२मध्ये एफआयआरसह प्रकरणाचा अहवाल कोर्टात सादर केला होता.
पीडित महिलेने आरोप लावला की, त्याच्या पतीने गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून चुकीचे काम करून घेत होता. या प्रकरणात आरोपी बनविण्यात आलेल्या निहालचंद यांनी हायकोर्टात अपील केले होते. त्यानंतर त्यांची बाजू ऐकण्यासाठी कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे.
निहालचंद मेघवाल राजस्थानमधील एकमेव खासदार आहेत. की त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.