नवी दिल्ली : आरक्षणावरून आदिवासी आणि धनगर समाजातला संघर्ष शिगेला पोहचलाय. धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी नेते आणि मंत्री दिल्लीत धडकले.
आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, विधान सभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, चिंतामण वनगा यांच्यासह १८ आदिवासी आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. धनगर समाजाला आधीच साडेतीन टक्के आरक्षण आहे. त्यामुळं त्यांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा आदिवासी नेत्यांनी दिलाय.
तर मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. तर दुसरीकडे धनगर समाजानं बारामतीमध्ये आंदोलन करत उपोषण पुकारलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.