नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे यंदा मुद्रांक शुल्कामधून मिळणा-या उत्पन्नात घट झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीनं कमी मुद्रांक शुल्क जमा झालंय.
नोंदणी कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी 16 हजार 254 कोटी रुपयांचं उत्पन्न मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळालंय. गेल्यावर्षी हा आकडा 17 हजार 244 कोटी इतका होता.
नोटाबंदीनंतर काही काळ मार्केटमध्ये घरखरेदी-विक्री आणि मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले होते. परिणामी मुद्रांक शुल्क कमी जमा झालंय. अजून काही काळ मालमत्ता खरेदी-विक्री बाजारात नोटाबंदीचा परिणाम राहणार आहे.
नोंदणी आणि मुद्रांकशुल्कच्या माध्यमातून सरकारला दर दिवशी साधारणपणे 65 कोटी इतकं उत्पन्न मिळत होतं. पण नोटाबंदीनंतर दर दिवशी 42 कोटी इतकंच उत्पन्न सरकारला मिळतंय.