सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा

टाटा सन्स आणि समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यामधल्या वादानं आज एक धक्कादायक वळण घेतलं.

Updated: Dec 19, 2016, 11:05 PM IST
सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा  title=

मुंबई : टाटा सन्स आणि समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यामधल्या वादानं आज एक धक्कादायक वळण घेतलं. मिस्त्री यांनी स्वतःहून समूहामधल्या सहा कंपन्यांमधल्या पदांचा राजीनामा दिला. त्याच वेळी रतन टाटा यांच्याविरुद्ध लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धारही बोलून दाखवला. 

आपल्याला अध्यक्षपदावरून काढल्याला आठ आठवडे झालेत. मात्र रतन टाटा यांनी हे पाऊल उचलण्याचं ठोस कारण अद्यापही दिलेलं नाही, असं मिस्त्री म्हणाले. व्हिडिओ रेकॉर्डेड मेसेजच्या स्वरुपात मिस्त्री यांनी मीडियासमोर आपलं म्हणणं मांडलंय.

टाटा सन्सनं पत्रक काढून त्यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. मिस्त्री हे बिनबुडाचे आणि खुळचट आरोप करत असल्याचा टोला या पत्रकात लगावण्यात आला आहे. कंपन्यांच्या बहुतांश समभागधारकांचा पाठिंबा नसल्याचं लक्षात आल्यावरच त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.