परदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी ५ दोषी

परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नऊ आरोपींपैकी ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, आरोपींना गुरूवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.

Updated: Jun 6, 2016, 08:18 PM IST
परदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी ५ दोषी

नवी दिल्ली : परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नऊ आरोपींपैकी ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, आरोपींना गुरूवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.

नवी दिल्ली स्थानकावर या सर्वांनी जानेवारी २०१४ मध्ये चाकूचा धाक दाखवून दानिश महिलेवर बलात्कार केला, आरोपींपैकी श्यामलाल याचा फेब्रुवारीमध्ये तिहार तुरुंगात मृत्यू झाला.

आरोपींमध्ये ९ पैकी ३ अल्पवयीन मुलं होती. दिल्लीच्या मध्यवर्ती भागात ५२ वर्षांच्या दानिश महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. 

अर्जून, राजू ऊर्फ छक्का, मोहम्मद राजा, महेंद्र ऊर्फ गंजा, राजू ऊर्फ बज्जी आणि श्यामलाल यांना दोषी ठरवण्यात आले आहेत.