कलयुगाचा युधिष्ठीर; फेसबुकवर लावली पत्नीची बोली!

कर्जात बुडालेल्या एका इसमानं यातून बाहेर पडण्यासाठी सोशल वेबसाईटवरच आपल्या पत्नीला विक्रीस काढलंय. 

Updated: Mar 8, 2016, 05:04 PM IST
कलयुगाचा युधिष्ठीर; फेसबुकवर लावली पत्नीची बोली!

इंदौर : कर्जात बुडालेल्या एका इसमानं यातून बाहेर पडण्यासाठी सोशल वेबसाईटवरच आपल्या पत्नीला विक्रीस काढलंय. 

महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केलीय. ही घटना मध्यप्रदेशच्या खरगौन जिल्ह्यातील आहे. 

आपला पती दिलीप यानं सोशल वेबसाईट फेसबुकवर आपला आणि आपल्या मुलीचा एक फोटो पोस्ट केला, अशी तक्रार या महिलेनं केलीय. कर्जातून मुक्त होण्यासाठी दिलीपनं आपल्या पत्नीची किंमत एक लाख रुपये जाहीर केली होती. 

या महिलेचा आणि दिलीपचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर हे दांपत्य इंदौरमध्ये स्थायिक झालं. इथे दिलीपनं अनेक जणांकडून कर्ज घेतलं होतं... आणि हे लोक आपले पैसे परत मिळवण्यासाठी दिलीपच्या मागे लागले होते. याला कंटाळून दिलीप इंदौरहून आपल्या गावाला पळून गेला होता. इथे त्यानं आपल्या पत्नीला आणि मुलीला फेसबुकवर विकण्याचा प्रयत्न केला.