विधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 4, 2013, 09:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांसमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं आव्हान उभं केलंय. शिला दीक्षितांच्या नेतृत्वाखाली सलग चौथ्यांदा सत्तेवर येऊन इतिहास रचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तर डॉ. हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा १५ वर्षांचा वनवास यंदा तरी संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानंही स्वच्छ प्रशासनाचा नारा देत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती. कमी मतदानासाठी दिल्लीकर ओळखले जातात. त्यामुळे अन्य चार राज्यातल्या मतदानाचा ट्रेंड दिल्लीत कायम राहणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
दिल्लीसह राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या चारही राज्यांचे निकाल ८ डिसेंबरला लागणार आहेत. त्यामुळे आजच्या दिल्लीतल्या मतदानानंतर सर्वांनाच ८ तारखेची प्रतीक्षा असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.