वासनांध तरूणींनी अनेक रिक्षा चालकांना बनवले शिकार?

 दिल्ली आता खतरनाक होत चालली आहे. दिल्ली आता खतरनाक झाली आहे. दिल्लीत खूनी दरवाजा नाही तर येथे रस्त्यावर इज्जत लुटणारे खुले आम फिरत आहेत. दिल्लीत काल वासनांध तरूणींनी रिक्षा चालकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. 

Updated: Jul 17, 2015, 04:11 PM IST
वासनांध तरूणींनी अनेक रिक्षा चालकांना बनवले शिकार?  title=

नवी दिल्ली :  दिल्ली आता खतरनाक होत चालली आहे. दिल्ली आता खतरनाक झाली आहे. दिल्लीत खूनी दरवाजा नाही तर येथे रस्त्यावर इज्जत लुटणारे खुले आम फिरत आहेत. दिल्लीत काल वासनांध तरूणींनी रिक्षा चालकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. 

तरूणींनी रिक्षा चालकाला घरी बोलावले आणि भाडे नेण्यास सांगितले. भाडे घेण्यासाठी आल्यावर त्याला बंधक बनविले आणि त्याला शारिरीक संबंध बनविण्यासाठी बळजबरी केली. 

या प्रकरणाच्या चौकशीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्याने तुम्हांलाही धक्का बसेल. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली, त्यावेळी अनेक रिक्षाचालकांचे लायसन्स आणि आर सी बूक सापडले. त्यामुळे संशय व्यक्त केला जातो की या मुलींनी अनेक रिक्षा चालकांना आपले शिकार बनविले आहे. 

पोलिस आता या रिक्षा चालकांचा शोध घेत असून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या रिक्षाचालकांचे लायसन्स सापडले त्यांचेही लैंगिक शोषण झाले का याची चौकशी होत आहे. 

दक्षिण दिल्लीत पीरागढ भागात इंदिरा युनिवर्सिटी म्हणजे इग्नूच्या कार्यालयाजवळ मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरूणीने ऑटो रिक्षा घेतली. साकेत जवळ काही सामान खरेदी करायचे आहे असे सांगून साकेत मार्गे सफदरजंगला रिक्षा न्यायला सांगितले.  त्याचे तीनशे रुपये घरी जाऊन देणार असे तरूणीने रिक्षा चालकाला सांगितले. 

घरी पोहचल्यावर सामान घरात नेताना तरूणीच्या हातात चमक भरली. सामान रिक्षावाल्याने घरापर्यंत पोहचवले. पण रिक्षा चालक घऱात पोहचल्यावर तरूणीची ताझानियाची परदेशी मैत्रीणीने मिळून त्याला बंधक बनविले आणि त्याचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. 

घडलेल्या प्रकारने रिक्षा चालक हादरला, त्याने प्राण वाचविण्यासाठी बाल्कनीतून उडी घेतली. त्यात त्याचे दोन पाय तुटले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.