अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक

२७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती. 

PTI | Updated: Dec 7, 2014, 01:43 PM IST
अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक   title=

नवी दिल्ली: २७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती. 

घटना रात्री साडे नऊची आहे. महिला त्यावेळी दिल्लीतील इंद्रलोक परिसरात आपल्या घरी परत येत होती. ती गुडगावमधील एका फायनांस कंपनीत नोकरीला आहे. 

पोलिसांनी पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून सांगितलं, “संध्याकाळी सात वाजता आपली शिफ्ट संपवून महिला काही मित्रांसोबत डीनरला गेली होती. त्यानंतर एका मित्रानं दिला वसंत विहारपर्यंत सोडलं. तिथून तिनं इंद्रलोकला जायला आपल्या फोनमधील अॅपद्वारे खाजगी कंपनीची टॅक्सी बुक केली.” 

महिला कारच्या मागच्या सीटवर बसली होती, रस्त्यात तिचा डोळा लागला. जेव्हा ती उठली तेव्हा एका सुनसान जागेवर होती आणि गाडीचे दरवाजे बंद होते. जेव्हा तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा टॅक्सी चालकानं तिला मारलं आणि तिच्यावर बलात्कार केला.  

आरोपीनं घटनेबद्दल कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही महिलेला दिली आणि तिला इंद्रलोकला घराजवळ सोडलं. पोलिसांनी सराय रोहिला पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार, जाणूनबुजून जखमी करणं आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाअंतर्गत गुन्हा नोंदवलाय.  

पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी कॅब कंपनी आणि चालकाची ओळख पटवली असून आताच त्याला अटक करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.