मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली रेक्स रॅकेट उघड, 5 जणांना अटक

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका मॉलमध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरच्या आड तिथं सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड झालाय. पोलिसांनी सेंटरचे संचालक, एक तरूण आणि पाच तरुणींना अटक केलीय. 

PTI | Updated: Jan 4, 2015, 07:44 PM IST
मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली रेक्स रॅकेट उघड, 5 जणांना अटक title=
प्रातिनिधिक फोटो

फरीदाबाद: हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका मॉलमध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरच्या आड तिथं सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड झालाय. पोलिसांनी सेंटरचे संचालक, एक तरूण आणि पाच तरुणींना अटक केलीय. 

पोलीस प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सूचना मिळाली की, इरोज मॉलमध्ये पंकज केडिया मसाज सेंटर आहे, या मसाज सेंटरच्या नावाखाली तिथं मुलींकडून सेक्स रॅकेट चालवलं जातं. पोलिसांनी सांगितलं सेंटरचा संचालक, एक तरूण आणि पाच मुलींना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून 4500 रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.