नवी दिल्ली : सोशल मीडियाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने एका रेल्वे पोलिसाला निलंबित केलं आहे, हा पोलीस जनरल रेल्वे बोगीत प्रवाशांकडून पैसे उकळत होता, तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अलाहाबादजवळ बमरौली गावाजवळ सप्तक्रांती एक्स्प्रेस आली असताना पोलिसाच्या वेशात हा पोलीस पैसे वसूल करत होता. हा व्हि़डीओ एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यानंतर या रेल्वे पोलिसाची ओळख पटवण्यात आली, यानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं, ज्याने हा व्हिडीओ ट्वीट केला होता, त्या कुणीक गौरला देखील रेल्वे मंत्रालयाने कारवाईची माहिती दिली आहे. पोलिसावर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले, त्याची देखील माहिती देण्यात आली आहे.