मेरठमध्ये विवाहित महिलेवर साधूंनी केला गँगरेप

 मेरठमधील दोन साधूंनी दिल्लीच्या एका विवाहितेवर एका आश्रमात गँगरेप केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

Updated: Jun 6, 2015, 06:03 PM IST
मेरठमध्ये विवाहित महिलेवर साधूंनी केला गँगरेप title=

मेरठ :  मेरठमधील दोन साधूंनी दिल्लीच्या एका विवाहितेवर एका आश्रमात गँगरेप केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

मेरठचे एएसपी संकल्प शर्मानुसार, पीडित महिला दरियांगज येथे राहणारी आहे. ती गेल्या आठवड्यात आपल्या पतीसह दौराला भागातील नांगली आझाद गावातील आश्रमात गेली होती.  प्रत्येक वर्षी पोर्णिमेनिमित्त यात्रा असल्याने पती-पत्नी या ठिकाणी आले होते. 

पीडित महिलाने केलेल्या तक्रारीनुसार यात्रेमध्ये जेवल्यानंतर ती आणि तिचा पती घरी परतत होते. पण दोघा साधूंनी त्यांना आश्रम येण्यास सांगितले. 

आश्रमात दोन्ही साधूंनी तिच्या पतीला बंधक बनविले. त्यानंतर त्यांनी महिलेसोबत गँगरेप केला. दिल्लीत परतण्याची अडचण आणि लोक लज्जेमुळे पीडित महिलेने पोलिसांत त्यावेळ तक्रार केली नाही. 

दरम्यान, महिला गुरूवारी महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहचली आणि घटनेची तक्रार दाखल केली. आरोपींचे नाव फेरू आणि राजू सांगण्यात येते. दरम्यान आश्रमातील मुख्य पुजारी पिंकी महाराज यांच्यानुसार दोन्ही साधूंचा आश्रमाशी काहीही संबंध नाही.  पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे असेही त्यांनी सांगतिले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.