जयललितांची संपत्ती 117 कोटी रूपये

Updated: Jun 6, 2015, 05:53 PM IST
जयललितांची संपत्ती 117 कोटी रूपये  title=

 

 
 
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची एकूण संपत्ती 117 कोटी असून त्यात 72.09 कोटी स्थावर आणि 45.04 जंगम मालमत्तेचा समावेश आहे. हा खुलासा त्यांनी आरके नगर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरताना केला आहे.
 
विशेष बाब अशी की जेव्हा मुख्यमंत्री जयललिता आपली संपत्ती घोषित करतात तेव्हा ती पूर्वीपेक्षा दुप्पट झालेली असते. 2006 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपली संपत्ती 24.7 कोटी घोषित केली होती. 2011 मध्ये ती वाढून 51.40 कोटी झाली. 2013-14 मध्ये दाखल केलेल्या आयकर रिटर्न मध्ये त्यांची संपत्ती 33.32 लाख रूपये होती.  
 
यापूर्वी जयललिता यांनी टोंडियारपेट क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक अधिकारी सौर्यराजन यांच्यासमोर अर्ज भरला होता. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी शशिकला, अर्थमंत्री ओ पन्नीरसेल्वम, अन्नाद्रमुकच्या सचिवमंडळाचे अध्यक्ष ई मधुसूदन, व्यंकटेश बाबू तसेच उत्तर चेन्नईतील खासदार उपस्थित होते. यावेळी महिलांसोबत अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
अर्ज भरून झाल्यावर जयललिता कार्यकर्त्यांना अभिवादन करून रवाना झाल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.