अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.

Updated: Jan 1, 2017, 04:25 PM IST
अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.

अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावासोबतच आणखी तीन प्रस्तावही या अधिवेशनात मांडण्यात आलेत. मुलायम सिंह यादव यांनी पक्षाचे मार्गदर्शक बनावे, शिवपाल यादव यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवावं आणि अखिलेश यादव यांची तात्काळ सपामधून हकालपट्टी करावी असे प्रस्ताव रामगोपाल यादव यांनी या अधिवेशनात ठेवले.. तसंच रामगोपाल यादव यांनी शिवपाल यादवांवर जोरदार टीका केलीय. मुलायम सिंह यांच्यासाठी मनात आदर असून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सपाचचं सरकार येईल असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केलाय..