देवासोबत व्यवहार करण्यासाठी डिमॅट अकाऊंट

 उज्जैनमधील महाकाल मंदिराचेही डीमॅट अकाऊंट सुरू करण्यात येणार आहे. त्या अकाऊंटद्वारे जगभरातील भाविकांना महाकाल मंदिरात शेअर दान करता येणार आहेत. 

Updated: Jun 14, 2016, 05:21 PM IST
देवासोबत व्यवहार करण्यासाठी डिमॅट अकाऊंट title=

उज्जैन :  उज्जैनमधील महाकाल मंदिराचेही डीमॅट अकाऊंट सुरू करण्यात येणार आहे. त्या अकाऊंटद्वारे जगभरातील भाविकांना महाकाल मंदिरात शेअर दान करता येणार आहेत. 

जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आता १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकाल मंदिराचेही डिमॅट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे.

सध्या भाविक ऑनलाइन वा मंदिरात नगद रक्कम वा सोने-चांदी आदी गोष्टी दान करतात. मात्र डिमॅट अकाऊंटच्या सहाय्याने भक्तांना या रकमेचे धनादेश आणि शेअर डिमॅट अकाऊंटद्वारे दान करता येणार आहेत.

मंदिर प्रशासनाला ज्या बँकेत अकाऊंट उघडायचे आहे तेथे त्यांना प्रथम एक अर्ज द्यावा लागेल आणि त्यानंतर अकाऊंट उघडण्यासाठी पॅनकार्ड नंबक, अॅड्रेस प्रुफे, मंदिराच्या विश्वस्त समिती महत्वाची कागदपत्रांची झेरॉक्स जमा करावी. 

बँक मंदिराच्या समितीच्या नावाने अकाऊंट उघडून देईल. या अकाऊंटमुळे सर्व भक्त शेअर्स, बाँड वगैरे सहजरित्या ट्रान्सफर करून मंदिरात दान करू शकतील. मंदिराची विश्वस्त समिती हे शेअर्स वगैरे विकून रोख रक्कम मिळवेल.