रिक्षा ओढणाऱ्याला राष्ट्रपती भवनाचं आमंत्रण

दिल्लीत 27 वर्षांपूर्वी राष्ट्रपती भवनावरून रिक्षा ओढणाऱ्या 51 वर्षांच्या एका रिक्षावाल्याला राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण आलं आहे. 

Updated: Jul 9, 2014, 08:14 AM IST
रिक्षा ओढणाऱ्याला राष्ट्रपती भवनाचं आमंत्रण title=

नवी दिल्ली : दिल्लीत 27 वर्षांपूर्वी राष्ट्रपती भवनावरून रिक्षा ओढणाऱ्या 51 वर्षांच्या एका रिक्षावाल्याला राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण आलं आहे. 

धर्मवीर कंभोज यांनी तासाभरात टोमॅटो, आवळा, कोरफळ, जांभूळ सारख्या औषधी फळांचा अर्क काढण्याचं यंत्र तयार केलं आहे. एका रिक्षावाल्याने अन्न प्रक्रिया यंत्राची निर्मिती केल्याने ही एक महत्वाची बाब समजली जात आहे. 

राष्ट्रीय कल्पकता प्रतिष्ठानने या गावाला भेट दिली आणि हे पल्प काढण्याचं यंत्र तपासला हे यंत्र विकसित करण्यासाठी आपल्याला 11 महिने लागले असल्याचं धर्मवीर यांनी सांगितलं. 

या यंत्रात वन औषधींपासून अर्क काढला जाऊ शकतो. एक किलो कोरफडमधून तासभरात अर्क काढला जातो. सव्वा किलो कोरफडच्या पानापासून एक लीटर जेल तयार केलं जातं.

धर्मवीर कंभोज हे हरियाणाचे आहेत, धर्मवीर यांचं काही कारणांमुळे वडिलांशी भांडण झालं, यानंतर यमुना नगरमधील त्यांचं घर सोडून ते जुन्या दिल्लीत बावली येथे रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवतांना 1987 मध्ये त्यांचा एक अपघात झाला, त्यांना आपल्या मूळगावी घरी परतावं लागलं, कित्येक महिने ते अंथरूणात खिळून होते.

आपले जुने दिवस आठवतांना धर्मवीर म्हणतात, मी राष्ट्रपती भवनासमोर रिक्षा ओढत असे, तेव्हा अनेक वेळा मनात यायचं राष्ट्रपती भवनात काय असेल, ते आतून कसं दिसत असेल, मला आता राष्ट्रपती भवनात जायला मिळणार यावर आपला विश्वासचं बसतं नसल्याचं धर्मवीर यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.