सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री

 रेल्वेने सामान्य माणसांशी जोडण्यासाठी आज पहिल्यांदा सोशल मीडियाच्या दुनियेत पाऊल ठेवलेय. कारण रेल्वेने आज एक हेल्पलाईन नंबर सादर केलीय. 

Updated: Jul 8, 2014, 08:43 PM IST
सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री title=
फाईल फोटो

नवी दिल्ली :  रेल्वेने सामान्य माणसांशी जोडण्यासाठी आज पहिल्यांदा सोशल मीडियाच्या दुनियेत पाऊल ठेवलेय. कारण रेल्वेने आज एक हेल्पलाईन नंबर सादर केलीय. 

139 नंबर असेल टोल फ्री
रेल्वेच्या माहितीसाठी सेवेचा नंबर 139 लवकरच टोल फ्री होणार आहे. रेल्वे वरिष्ठ अधिकारी यांच्या मते, रेल्वे एक नवीन नंबर(022-45012222) सुरु करणार आहे ज्यावर लोक त्या नंबर वर फोन करुन लाईव्ह बजेट ऐकु शकतात. 

रेल्वे मंत्री सदानंद गौडा आणि रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी आज यांची घोषणा केलीय. फेसबुक वर 7 हजार हून जास्त लोकांनी रेल्वे पेजला लाईक केले आहे. तसेच टिवटरवर 2 हजार 500 लोकांनी रेल्वे मंत्रालयाच्या पेजला फॉलो केलेय. 

रेल्वे मंत्रालय सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांचा सोशल मीडियावरील वापर वाढलाय.  देश- विदेशाता सोशल मीडियाच्या प्रभावामध्ये भारतीय रेल्वे ही मागे नाहीय.  
 
रेल्वे बोर्डाच्या नव्या सूचनेनुसार, रेल्वेच्या प्रत्येक झोनचा स्वतःचा एक वेगळे प्रोफाईल असेल. या सामान्य जनतेसाठी महत्त्वाची माहिती ही दिली जाईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.