रावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी

दादर येथील रेल्वेच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचे माजी रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Jun 29, 2015, 06:04 PM IST
रावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी

मुंबई : दादर येथील रेल्वेच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचे माजी रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांना सुरूवातीला भैय्या म्हणत, मग भाऊ म्हणून सावरासावर केली, तसेच त्यांनी माजी रेल्वे मंत्र्यांनी फक्त त्यांच्याच प्रदेशाचा विकास केला, तेव्हा आपण महाराष्ट्रात रेल्वे प्रवाशांना चांगली सुविधा देण्यात यावी, अशी सूचना ही रावते यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना केली.

नाना शंकरशेट यांचा सन्मान करणारे स्मारक रेल्वेने मुंबईत उभारावे, अशी मागणी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली मागणी. रावते दादर येथील कार्यक्रमात बोलत होते.

दादर रेल्वे स्टेशनचं अत्याधुनिक रेल्वे स्टेशनमध्ये रुपांतर करणारा प्लान रेल्वे मंत्र्यांना दिला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्र्यांनी लवकरात लवकर दादर रेल्वे स्टेशनचा कायापालट करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.