इंदोर : शासकीय आंबेडकर रुग्णालयात रविवारी सकाळी जन्मलेल्या एका बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर त्या मुलीला नातेवाईक घरी घेऊन आले आणि तिच्या अंतिम संस्कारांची तयारी करू लागले.
मुलीला दफन करण्याची तयारी सुरू झाली पण अचानक त्या चिमुरडी ही श्वास घेत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. या घटनेनंतर रुग्णालयाला सुरक्षा पुरवण्यात आली.
मुलीला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. हंसराज वर्मा यांनी म्हटलं आहे की, '५ व्या महिन्यात मुलीचा जन्म झाल्याने काही वेळा नवजात मुलांचा श्वाच्छोश्वास सुरू होण्यास वेळ लागतो. या प्रकरणातही असंच झालं असेल. मुलगी ही खूप कमजोर असल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.'