आता, तुम्हीच करा तुमची कागदपत्रं ‘अटेस्टेड’!

नागरिकांनो, आता तुमच्या धांदलीच्या वेळी तुमची कागदपत्रं योग्य अधिकाऱ्यांकडून 'अटेस्टेड' करण्यासाठीची तुमची दगदग अखेर थांबणार आहे. 

Updated: Jul 16, 2014, 12:30 PM IST
आता, तुम्हीच करा तुमची कागदपत्रं ‘अटेस्टेड’! title=

नवी दिल्ली : नागरिकांनो, आता तुमच्या धांदलीच्या वेळी तुमची कागदपत्रं योग्य अधिकाऱ्यांकडून 'अटेस्टेड' करण्यासाठीची तुमची दगदग अखेर थांबणार आहे. 

महाविद्यालयात प्रवेश घेताना किंवा इतर कोणत्याही सरकारी कामांसाठी तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती साक्षांकीत प्रती मागितल्या जातात... अशा वेळी या प्रती साक्षांकीत करण्यासाठी राजपत्रित अधिकारी किंवा नोटरीकडे जाऊन या प्रती साक्षांकित करून आणण्यासाठी धावपळ करावी लागे... आता मात्र तुमची ही धावपळ थांबणार आहे. कारण, आता तुमच्या कागदपत्रांना तुम्हीच ‘अटेस्टेड’ करण्याची मुभा तुम्हाला देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांचे पैसे आणि वेळही वाचणार आहे. स्वत: अटेस्टेड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर केवळ सही करावी लागणार आहे... आणि जेव्हा तुम्ही ही कागदपत्रं संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला या झेरॉक्स कागदपत्रांची मूळ प्रत सादर करावी लागेल.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.