नवी दिल्ली : आमचे पाच वर्षांत कोणतेही संबंध नव्हेत, असे विधान करणारे आपचे आमदार सोमनाथ भारती अडचणीत आले आहेत. त्यांची पत्नी लिपिका यांनी म्हटलेय, संबंध नव्हते तर मुलं कशी झालीत?
आमदार सोमनाथ भारती यांची पत्नी लिपिका यांनी भारतींवर केलेल्या छळाच्या आरोपानंतर दोघा पती-पत्नींमध्ये सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध भलतेच चिघळले आहे. गेल्या पाच वर्षांपासून आमच्यात संबंधच नाहीत, असं म्हणणाऱ्या भारती यांना लिपिकानं कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. पाच वर्षे आमचे संबंध नव्हते तर मग दोन मुलं कशी झाली, असा प्रतीसवाल लिपिका यांनी केला.
लिपिका यांनी केलेले शारीरिक व मानसिक छळाचे आरोप सोमनाथ यांनी फेटाळले आहेत. दरम्यान, लिपिकाने ५ वर्षांपासून दोघांमध्ये असलेल्या संबंधाचे पुरावे म्हणून ई-मेलच सादर केले. आमच्यात संबंध होते हे सिद्ध करावे लागते हे माझं दुर्दैव आहे. सोमनाथ हे रात्री-बेरात्री लपून-छपून घरी यायचे. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हरसुद्धा असायचा, दावा त्यावा त्यांनी केला.
अनेकदा ते मुलांना घेऊन बाहेर फिरायला जायचे. काही काळ आमच्या दोघांमध्ये बोलणे बंद होते. त्यावेळी सोमनाथने इमेलद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्याला प्रतिसाद दिला नाही, हेही लिपिकांनी स्पष्ट केले.
मला सोमनाथपासून घटस्फोट हवा आहे. यासाठी कोर्टाच्या माध्यमातून किंवा दोघांच्या सहमतीनं निर्णय व्हावा असं मला वाटतं. तसंच मला माझ्या मुलांचा ताबा हवा आहे, असे लिपिका म्हणाल्यात. अज्ञात लोकांकडून मला कॉल येत असल्याने भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमनाथ भारती यांच्याविषयी मीडियात चर्चा सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शांत का बसले आहेत, असा सवाल करतानाच, माझा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत जाईल आणि ते मला नक्कीच मदत करतील, अशी आशाही लिपिका यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सोमनाथ यांनी बॅंक खाते आणि गृहकर्जाविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोपही लिपिकानी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.