छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी

इंडोनेशियातल्या बालीमधून अटक करण्यात आलेल्या छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आलीय. 

Updated: Nov 7, 2015, 07:47 PM IST
छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी title=

नवी दिल्ली : इंडोनेशियातल्या बालीमधून अटक करण्यात आलेल्या छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आलीय. 

सुरक्षेच्या कारणास्तव राजनची सुणावणी सीबीआयच्या मुख्यालयातच करण्यात आली. गेल्या २७ वर्षांपासून फरार असलेल्या राजनला कालच इंडोनेशियातून भारतात आणण्यात आलं. त्याच्याविरोधात सत्तर पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून यातल्याच एका गुन्हाखाली त्याला सीबीआय कोठडी देण्यात आलीय.

२५ ऑक्टोबरला राजनला बालीत अटक कऱण्यात आली होती. त्यानंत इंडोनेशिया सरकारनं त्याला कालच भारताच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर सीबीआयने आपल्या ताब्यात त्याला घेतले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.