शी जिनपिंग यांचे नावात केला घोळ, अँकरने गमावली नोकरी

भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्पती शी जिनपिंग यांचे नाव उच्चारण्यात चूक केल्यामुळे दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाला आपली नोकरी गमवावी लागली.

PTI | Updated: Sep 19, 2014, 09:05 PM IST
शी जिनपिंग यांचे नावात केला घोळ, अँकरने गमावली  नोकरी  title=

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्पती शी जिनपिंग यांचे नाव उच्चारण्यात चूक केल्यामुळे दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाला आपली नोकरी गमवावी लागली.

दूरदर्शनच्या या वृत्तनिवेदकाने जिनपिंग यांच्या नावापूर्वी 'Xi' चा अर्थ रोमन लिपीतील ११ आकडा असा गृहीत धरून, त्यांचा उल्लेख 'अकरावे जिनपिंग' असा केला. या लाजिरवाण्या चुकीनंतर संबंधित वृत्तनिवेदकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दूरदर्शनवर गुरूवारी रात्री उशीरा प्रसारित करण्यात आलेल्या बातमीपत्र वाचताना संबंधित वृत्तनिवेदकाकडून ही चूक घडली.

 
इंग्रजी Xi असे लिहिल्यावर चीनचे राष्ट्रपतींचे नाव शी असा उच्चार होतो. अधिकाऱ्यांना सांगितले की हा प्रकार लगेच लक्षात आला होता.  ही कर्मचारी कॉट्रॅक्टवर कामावर होती. नियमीत कर्मचारी कामावर नसतात तेव्हा कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांना बातमीपत्र वाचण्यास घेतले जाते. दूरदर्शनच्या डी जी (बातम्या) अर्चना दत्त यांनी सांगितले की, विशेष पाहुण्यांच्या नावाच्या उच्चारणात गंभीर चूक केल्यामुळे कॉन्ट्रॅक्टवरील या अँकरच्या सेवा त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.