नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीने भारतीय मुसलमानांबाबत एक आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारतीय मुसलमानांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थितीत करू शकत नाही. कारण भारतीय मुसलमान देशासाठी जगतो आणि देशासाठी मरतोही.
अलकायदाने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला त्यात भारतात आपली शाखा बनविण्यात आणि भारतीय मुसलमानांना मदत करण्याचे आवाहन करण्याच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, भारतीय मुसलमानांच्या देशभक्तीवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह आपण लावू शकत नाही. अलकायदाच्या नादात भारतीय मुसलमान त्यांच्यामागे जाणार नाही. मोदींनी सांगितले की, अलकायदा भ्रमात आहे की भारतीय मुसलमान त्यांची साथ देईल. भारतीय मुसलमान कधी भारताच्या मुळावर उठणार नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले, माझे मत आहे, अलकायदा आमच्या देशाच्या मुसलमानांवर अन्याय करीत आहेत. जर कोणी असा विचार करीत असेल की मुसलमान त्यांच्या इशाऱ्यावर नाचणार तर हा त्यांचा भ्रम आहे. भारताचा मुसलमान प्राणाची आहुती देईल पण भारताशी विश्वासघात करणार नाही. मुसलमान भारतासाठी वाईट विचारच करू शकत नाही.
दहशतवादी संघटना अलकायदा संदर्भात पीएम मोदी म्हणाले, जगात मानवतेला वाचविले पाहिजे, मानवतेला मानणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.