कोची : तुम्हाला हे ऐकून थोडे विचित्र वाटेल मात्र सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांना डोश्याची चिंता सतावतेय, हो हे खरं आहे. महागाई कमी असल्याचा दावा आरबीआय करते मात्र त्यानंतरही डोश्याच्या किंमती का वाढतायत? असा प्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा डोश्याच्या किंमती वाढण्यास तवा जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोचीमध्ये फेडरल बँकेच्या एका कार्यक्रमात काही इंजीनियर विद्यार्थ्यांनी महागाई दर घटतोय मात्र डोश्याच्या किंमती का वाढतायेत असा सवाल केला. या प्रश्नावर उत्तर देताना, डोसा बनवण्यासाठी आजही त्याच तव्याचा वापर होतोय. कोणतीही नवी टेक्नॉलॉजी वापरली जात नाहीये. यामुळेच डोश्याच्या किमती सतत वाढत आहेत, असे राजन म्हणाले.
बँकिंकसह अनेक क्षेत्रे आहेत जिथे टेक्नॉलॉजीमुळे काम सोपे आणि उत्पादन अधिक होऊ लागले. परदेशातल अनेक अशी क्षेत्रे आहेत जिथे टेक्नॉलॉजीचा वापर होत नाहीये साहजिकच त्याचा उत्पादनावर परिणाम होतोय. डोश्यांबाबतही हेच आहे.