चेन्नई : देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या सुनिती सोलोमन यांचे चेन्नईमध्ये कर्करोगानं निधन झाले. एड्स निर्मुलनामध्ये खंदा संशोधक हरपल्याची खंत व्यक्त होत आहे. सुनिती यांचा जन्म मराठी कुटुंबात झालाय.
भारतात एड्सच्या संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन यांचं चेन्नईत निधन झालंय. १९८५ मध्ये देशात एड्सचा वेगानं प्रसार होत असताना,डॉ सुनितींनी पुढाकार घेऊन एड्स प्रसाराची कारणं, त्यावरच्या उपचारांसाठी लागणारी यंत्रणा, आणि भारतात त्याबाबतची जागृती यासाठी सारं आयुष्य वेचलं. सार्वजिनक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचं काम साऱ्या जगात वाखाण्यात आलं.
चेन्नईत त्यांनी उभ्या केलेल्या वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँड एड्युकेशन या संस्थेत साडे पाच हजार रुग्णांवर उपचार करण्यात येतात. डॉ. सुनिती यांना तीन महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचं निदान झालं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल संध्याकाळी डॉ. सुनिती यांनी अखेरचा श्वास घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.