`तरूणींनी जीन्स-टॉप घालायचे नाहीत.....`

महिलांच्या, युवतींनी कसे कपडे परिधान करावे यावर आता नवी चर्चा रंगू लागली आहे. मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात जैन समाजाने तरूणींनी जीन्स-टॉप असे कपडे परिधान करू नये असा फतवा काढला आहे.

Updated: Dec 27, 2012, 04:32 PM IST

www.24taas.com, भोपाळ
महिलांच्या, युवतींनी कसे कपडे परिधान करावे यावर आता नवी चर्चा रंगू लागली आहे. मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात जैन समाजाने तरूणींनी जीन्स-टॉप असे कपडे परिधान करू नये असा फतवा काढला आहे.
नागरी प्रशासन मंत्री बाबूलाल यांनी तरूणींच्या कपडे परिधान करण्याच्या पद्धतीवरच प्रश्न निर्माण केला आहे. दिल्लीत चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरूणीवर गँगरेपच्या घटनेनंतर जैन समाजाने तरूणींच्या पेहरावाबद्दल प्रश्न उभा केला आहे. जैन समाजाने जीन्स-टॉप आणि पारदर्शक कपड्यांवर बंधने यावीत अशी मागणी केली आहे. छेडछाड, विनयभंग, बलात्कार यासारख्या घटनांना तरूणींचे पाश्चिमात्य संस्कृतीचे कपडे वापरणं कारणीभूत ठरतं.
जीन्स आणि टॉप परिधान करणं हे जैन समाजात उचित समजलं जात नाही. जैन मुनियोंच्या मते, यामुळे वाईट कृत्यांना आळा बसेल. तर दुसरीकडे मध्यप्रदेशमधील राज्यसकराचे कृषीमंत्री रामकृष्ण कुसमरिया यांनी विधानसभेत तरूणींच्या या कपड्यांवर लवकरच बंधने यावीत यासाठी आवाज उठवला आहे.