दुष्काळ : कर्नाटकला १५०० कोटी, महाराष्ट्र प्रतिक्षेतच

राज्य सरकारनं दुष्काळाच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात उशीर केला, आणि त्यामुळे अजूनही केंद्राची मदत पोहचू शकलेली नाही, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंहांनी दिली आहे. 

Updated: Dec 1, 2015, 10:56 PM IST
दुष्काळ : कर्नाटकला १५०० कोटी, महाराष्ट्र प्रतिक्षेतच title=

नवी दिल्ली : राज्य सरकारनं दुष्काळाच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात उशीर केला, आणि त्यामुळे अजूनही केंद्राची मदत पोहचू शकलेली नाही, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंहांनी दिली आहे. 

काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर लोकसभेत हे उत्तर देण्यात आलं. कर्नाटक सरकारनं आधी प्रस्ताव पाठवला. त्यामुळे त्यांना १५०० कोटी रुपयांची मदत केली. महाराष्ट्रात केंद्राच्या पथकानं नुकतीच भेट दिली. हे पथक सोमवारी दिल्लीत आलंय. 

येत्या दोन तीन दिवसात मदतीची रक्कम जाहीर होईल, असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं आहे. केंद्रीय कृषीमंत्र्याच्या उत्तरानं महाराष्ट्राचा प्रस्ताव उशिरानं पोहचल्याचं उघड झालंय.  

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या मते केंद्रानं आधीच ९०० कोटी दिल्याचं म्हटलं आहे, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीही दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी लवकर किंवा उशीराचे निकष न लावता, तातडीनं मदत करण्याचं आवाहन केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.